आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील मंत्रीच काय, CM फडणवीसही माझा सल्ला घेतात; पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- सत्ता म्हणजे काय हे पाहायचे असेल तर बीड जिल्ह्यातील कोणताही निर्णय मला विचारल्याशिवाय होत नाही. मंत्रीच काय, तर मुख्यमंत्रीदेखील माझाच सल्ला घेतात, असे वक्तव्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
 
नेकनूर येथे बुधवारी विविध विकासकामाच्या उद‌्घाटनप्रसंगी पंकजा म्हणाल्या, बीड जिल्ह्याच्या मी तुमच्याशी गप्पा मारू शकत नाही. परंतु प्रत्येक प्रत्येक तास, प्रत्येक क्षण विकासाच्या कारणी लावायचा आहे. मला विचारल्याशिवाय बीडला कोणताही मंत्री निधी देत नाही. याला म्हणतात सत्ता. मुख्यमंत्रीही एकदा म्हणतात, पंकजा मुंडे यांना विचारून घ्या. निधीची फाइल मुख्यमंत्री मला विचारूनच पाठवतात, असा दावाही त्यांनी केला. जिल्हा परिषदेतील  राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचा पाढाही त्यांनी वाचला. आपले (भाजप) लोक मात्र कुठेही सह्या करतात, त्यांना खायचे कसे तेही कळत नाही, असेही पंकजा म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...