आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी युनियन बँकेची चौकशी करावी; आक्रोश सभेत पृथ्वीराज चव्हाण यांचे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- कर्जमाफीची बनावट आकडेवारी सादर करणाऱ्या युनियन बँकेला कोट्यवधीचे अनुदान देण्याऐवजी बँकेची चौकशी करावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यंमंत्र्यांना उस्मानाबाद येथे बोलताना  दिले. तसेच एकाच आधार क्रमांकावर अनेक शेतकऱ्यांची नोंदणी झाली असतानाही अद्यापही का कारवाई झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

काँग्रेसची मराठवाडा विभागीय आक्रोश सभा रविवारी (दि. ५) उस्मानाबाद येथे पार पडली. या वेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. या वेळी  ाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राज्य प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लाखो बनावट शेतकऱ्यांची नोंदणी कर्जमाफीसाठी करण्यात आल्याचे समोर येऊनही युनियन बँकेची चौकशी केली जात नाही. उलट केंद्र सरकारने सव्वा दोन लाख कोटी रुपयांचे अनुदान  बँकेला दिले आहे. असा प्रकार का होत आहे, केंद्र व राज्य सरकारमध्ये बसलेल्यांचे काय लागेबांधे आहेत, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी एकाच आधार क्रमांकावर अनेकांनी कर्जमाफीचे अर्ज भरल्याचे म्हटले आहे. तेव्हा संबंधितांवर का करवाई करण्यात आली नाही. त्यांना पाठीशी घालण्याचे काय प्रयोजन आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

राज्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १० डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व खड्डे बुजवून नवीन रस्ते तयार करण्याची घोषणा केली आहे. मात्र, सरकारमधील सर्व मंत्री थापाडे आहेत.  मुदतीत खड्डे बुजण्याची शक्यताच नाही. नागरिकांनी मुदतीनंतर 
खड्ड्यांसोबत काढलेला फोटो मंत्री पाटील यांना पाठवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी, असेही आवाहन त्यांनी केले. 
 
 
विदेशी शक्तींच्या  इशाऱ्यावर काम 
 केंद्रातील मोदी सरकार विदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनी केला. ते म्हणाले, नोटबंदी झाल्यानंतर मोदी जपानला गेले. जीएसटी लागू केला. अमेरिकन राष्ट्रध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना भेटले. त्यामुळे सर्व निर्णय विदेशी नेत्यांच्या इशाऱ्यावर घेतले जात असल्याची शंका येत आहे, असे मोहन प्रकाश म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...