आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीची छेड काढणे रोमिओला पडले महागात, बीडच्या न्यायालयाने ठोठावला दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- मुलीची छेड काढल्यांनतर पोलिस आपल्या मागावर असल्याचे कळताच फरार झालेल्या रोमिओला बुधवारी शहरातील माळीवेस रोडवर फिरताना छेडछाड विरोधी पथकाच्या पोलिसांनी अखेर पकडले. न्यायालयासमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला बाराशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बीड शहरामध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रकार थांबवण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी छेडछाड विरोधी पथकाची स्थापना केली. गेल्या चार वर्षापासून हे पथक बीड शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात कारवाई करत असल्याने छेडछाडीचे प्रमाण घटले आहे. मागील चार महिन्यांपूर्वी बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात राहणारा आदिनाथ महादेव गोंदणे (वय २१) या रोड रोमिओने माळीवेस परिसरातील एका मुलीची छेड काढली होती. यानंतर मुलीने छेडछाड विरोधी पथकास माहिती दिली. या प्रकारानंतर पोलिस आपल्या मागावर असल्याचे रोमिओला कळताच तो पसार झाला. तब्बत चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत राहिला. आदिनाथ हा बीड शहरात आल्याची माहिती छेडछाड विरोधी पथकाच्या पोलिसांना समजली.
बुधवारी हा रोमिओ सकाळी माळीवेस परिसरात फिरत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला दुपारी न्यायालयासमोर हजर केले. मुलीची छेडछाड केल्याची कबुली त्याने न्यायालयात देत माफी मागितली आणि गुन्ह्याची कबुली दिली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, उन्हाळी सुटीतही राहणार वॉच...
बातम्या आणखी आहेत...