आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पळाले, पण इरफान मुख्यमंत्र्यांसाठी धावला; असे खोटे वृत्त देणाऱ्या पत्रकारावर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर  - निलंगा येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलिस पळाले, पण मुख्यमंत्र्यांच्या मदतीला इरफान धावला, अशी बातमी देणाऱ्या एका दैनिकाच्या वार्ताहरावर निलंगा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २५ मे रोजी निलंगा तालुका दौऱ्यावर आले होते. कार्यक्रम आटोपून त्यांचे हेलिकॉप्टर उडताच ते खाली कोसळले होते. सदर वृत्त देताना एका दैनिकाच्या निलंगा येथील वार्ताहराने ‘पोलिस पळाले, पण इरफान मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावला,’ या मथळ्याखाली वृत्त दिले होते. रविवारी पोलिस नाईक हनुमंत पडिले यांनी निलंगा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सदर वृत्त खोटे आहे. वास्तविक पाहता घटनास्थळी पालकमंत्री, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपाअधीक्षकांसह शेकडो पोलिस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. घटना घडत असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस व अन्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरकडे धाव घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह अन्य मंडळींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचे फोटो व व्हिडिओही उपलब्ध आहेत.  परंतु वार्ताहराने खोटी बातमी देऊन पोलिस व सरकारी यंत्रणेची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...