आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ मुलीचा मृत्यू अॅस्पिरेशनमुळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड : पोलिओ आणि पेंटाव्हॅलंटची लस दिल्यानंतर दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे घडली होती. या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आला असून मुलीचा मृत्यू लसीमुळे नव्हे, तर अॅस्पिरेशनमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लसीमुळे मृत्यू झाल्याचा मुलीच्या पालकांनी दावा केल्याने तपासणीसाठी ही लस मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.
गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे आरोही सुरेश बजगुडे या दोन महिन्यांच्या चिमुकलीला सोमवारी गावातील आरोग्य सहायिका एस. एस. शेलार यांनी पोलिओ आणि पेंटाव्हॅलंट लस दिली हाेती. यानंतर काही वेळ खेळून नंतर मुलगी झोळीत झोपली. काही वेळानंतर ती झोळीतून उठत नसल्याचे पाहून तिच्या आईने तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता तिच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आले.
उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले होते. दरम्यान, लसीकरणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आरोहीचे वडील सुरेश यांनी केला होता. सोमवारी रात्रीच आरोहीच्या शवविच्छेदनाचा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून आरोग्य विभागाला प्राप्त झाला. यात अॅस्पिरेशनमुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे.

बीडमध्ये तातडीची बैठक
सोमवारच्या प्रकारानंतर मंगळवारी या संदर्भात असलेल्या समितीची बीड येथे तातडीची बैठक घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, संघटनेचे प्रतिनिधी आदी समितीच्या सदस्यांनी याबाबत चर्चा केली.
लसीकरणाबाबत गैरसमज नको
- लसीकरणामुळे आरोहीचा मृत्यू झाला नसून लसीकरणाबाबत कोणताही गैरसमज सामान्यांमध्ये राहू नये, असे प्रकार टाळण्यासाठी स्तनपानानंतर मातांनी बाळाला झोळीएेवजी पाळण्यात झोपवावे.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
बातम्या आणखी आहेत...