आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी पुरात वाहून गेला; केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- तालुक्यातील काळेगाव घाट येथील केरबा हरिबा निर्मळ (७०) हे रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आपल्या  मेंढ्या चारण्यासाठी नदीच्या पात्रातील पाण्यातून जात असताना ते पाण्याच्या प्रवाहात अर्धा किमी अंतरावर वाहत जाऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.  
रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान बोभाटी नदीच्या पलीकडे शेतात असलेल्या मेंढ्यांना चारायला घेऊन जाण्यासाठी केरबा निर्मळ हे नदीच्या पात्रातील पाण्यातून पलीकडे जात होते. दरम्यान, नदीच्या पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा त्यांना अंदाज न आल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहातच वाहून गेले. 

नातेवाइकांनी इतर नातेवाइकांकडे चौकशी केली व शोध घेतला. परंतु त्यांचा पत्ता कोठेही लागला नाही. सोमवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह घटनास्थळापासून अर्धा किमी खाली नदीपात्रात आढळून आला. मृताचा मुलगा भीमराव केरबा निर्मळ यांच्या खबरीवरून केज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...