आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीच्या काळात मदतीला धावणारा िदवा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्ह्यात लवकरच प्रात्यक्षिक
शासनानेपाठविलेले ३२ िदवे हे प्रत्येक तालुक्याला प्रत्येक पालिकेला एक याप्रमाणे िमळणार अाहेत. जळगाव मनपा जिल्हाधिकारी कार्यालयास प्रत्येकी एक िदवा मिळणार अाहे. िदव्यांच्या हाताळणीबाबत कंपनीचे प्रतिनिधी त्या त्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण देणार असल्याचे जिल्हा अापत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी. रावळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात चाचणी
राज्यशासनाकडून िमळालेल्या ‘इनफ्लेटेबल’ पाेर्टेबल लाइटची चाचणी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात घेण्यात अाली. ही चाचणी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या उपस्थित झाली. या वेळी अक्सा या कंपनीच्या प्रतिनिधींनी हा िदवा कसा हाताळावा, काय काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर माहिती दिली.
0८ लिटरपेट्राेल क्षमता
१० तासदेताे प्रकाश
१५० फूटपरिघात पसरताे प्रकाश

अापत्कालीन परिस्थिती उद‌्भवल्यास मदत कार्याला मदतगार ठरू शकणारे ३२ ‘इनफ्लेटेबल’ पाेर्टेबल लाइट (टाॅवर) जिल्हा प्रशासनाला शासनाकडून नुकतेच प्राप्त झाले अाहेत. भूकंप, पूरजन्य परिस्थिती, विद्युत पुरवठा नाही असा दुर्गम भाग, भीषण अपघात, अशा ठिकाणी या पाेर्टेबल लाइटचा वापर करून मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबवता येते. एका लॅम्पची किंमत सुमारे दीड लाख असून शासनाने राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याला या लॅम्पचे वाटप केले अाहे. हा िदवा पेट्राेल अािण विजेवर चालताे.
बातम्या आणखी आहेत...