आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खा. मुंडेंच्या नावाने बनावट लेडरपॅड वापरून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहाराचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- पंडित दीनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली तीन एकर जागेसाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे बनावट लेटरपॅड वापरल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. विशेष म्हणजे या लेटरपॅडवरून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून ३ एकर जागा मिळवण्याचाही प्रयत्न झाला. याप्रकरणी रुग्णालय व निसर्गोपचार केंद्राच्या ट्रस्टींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित दीनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गाेपचार केंद्र गेवराई तालुक्यातील वाहेगाव आम्ला येथे प्रस्तावित आहे. दोन्ही संस्थेच्या ट्रस्टने रुग्णालय व निसर्गोपचार केंद्रासाठी वाहेगाव आम्ला येथे सर्व्हे क्र. ४७ मध्ये तीन एकर जागेची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यासाठी बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे लेटरपॅड वापरण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या बनावट शिफारस पत्राच्या प्रती प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनाही दिल्याचे उघड झाले. ही बाब निदर्शनास आल्यावर खा. मुंडेही चक्रावून गेल्या. त्यांचे स्वीय सहायक नवनाथ सानप यांनी या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात  पंडित दीनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गाेपचार केंद्राच्या संचालकांविरोधात तक्रार दिली. यावरून  फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक सतीश जाधव 
करत आहेत. दरम्यान, किती जणांना असे बनावट शिफारस पत्र देऊन लाभ घेतल्याचा प्रकार घडला का याचीही चौकशी आता होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...