आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कंपनीतील तांत्रिक कामगारांचे परभणी शहरात साखळी उपोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी : राज्य वीज वितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने बुधवारपासून (दि.सात) येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
तांत्रिक कामगार संघटनेच्या काही सभासदांना पदोन्नती व पदस्थापना मिळाल्या; परंतु ते त्या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांना पुन्हा परत बोलावून घेण्यात आले. काही संघटनांच्या दडपशाहीमुळे हा निर्णय रद्द करून एका विशिष्ट संघटनेच्या ८ सभासदांची परभणी शहर, सेलू उपविभाग व सोनपेठ उपविभागात त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदलीचे आदेश काढले गेले आहेत, असाही आरोप संघटनेने केला आहे.
हा निर्णय रद्द करून तांत्रिक कामगार संघटनेच्या सभासदांना पूर्वी दिलेल्या नियुक्त्या कायम करण्यात याव्यात, दबावतंत्राने परत घेण्यात आलेला निर्णय रद्द करून विशिष्ट संघटनेच्या सभासदांप्रमाणेच तांत्रिक कामगार संघटनेच्या सदस्यांची बदली कायम ठेवण्यात यावी,
अशी मागणी संघटनेचे सर्कल सचिव बी.आर.सवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बदली व पदोन्नती होऊन रद्द करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादीही संघटनेने अधीक्षक अभियंत्यांना सादर केली आहे. यासह अन्य मागण्यांचाही उल्लेख केला असून ही मागणी मान्य न झाल्यास संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असाही इशारा दिला आहे.
अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर या मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून यात तांत्रिक कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...