आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Rivers Not Keeping People , Says Rajendrasinh

लोकांना नद्यांचे पावित्र्य जपता येत नाही- राजेंद्रसिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड येथे सोमवारी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहजी यांनी गोदावरीचे प्रदूषण पाहून त्यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, माजी नगरसेविका अरुंधती पुरंदरे आदी होते.  छाया: सतीश शर्मा - Divya Marathi
नांदेड येथे सोमवारी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहजी यांनी गोदावरीचे प्रदूषण पाहून त्यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, माजी नगरसेविका अरुंधती पुरंदरे आदी होते. छाया: सतीश शर्मा
नांदेड- राज्यातील लोकांना नद्यांचे पावित्र्य जपता येत नसल्याची खंत मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंहजी राणा यांनी व्यक्त केली. शंकरराव चव्हाण व्याख्यान मालेत महाराष्ट्रासाठी नदी पुनरुज्जीवनाची आवश्यकता या विषयावर भाषण देण्यासाठी त्यांचे आगमन झाले. त्यांनी शहरातील विष्णुपुरी प्रकल्प, थुगाव, गोवर्धनघाट, बोंढार येथे पाहणी करून गोदावरी परिक्रमा केली.
या वेळी ते म्हणाले, लोकशाहीत प्रत्येक जण हक्काच्या जपवणुकीसाठी आग्रही आहे. नदी, पर्यावरणाच्या हक्काचे काय? नदीपासून आपण पिण्यासाठी पाणी घेतो, उद्योग, शेतीसाठी घेतो. परंतु तिच्या हक्काची जपवणूक करीत नाही. ितच्या मार्गात धरणे, घाण पाणी, सांडपाणी, कचरा आदीमुळे व्यत्यय आणतो. मातीपासून तयार झालेल्या निर्जीव मूर्ती किंवा कोणत्याही वस्तूचे मातीत विसर्जन केले पाहिजे. पाण्यासापासून तयार झालेल्या वस्तूचे पाण्यात व वायूपासून तयार झालेल्या वस्तूचे विसर्जन वायूत केले पाहिजे तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, असेही ते म्हणाले.
गोवर्धन घाटावर नदीच्या पात्रात व काठावर पडलेला कचरा, प्लॅस्टिक, घाण पाणी पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. विष्णुुपुरी ते बाभळीच्या दरम्यान ११ बंधारे बांधले, परंतु पाण्याचा दर्जा पाहता त्याचा उपयोग शून्य असल्याचे त्यांनी सांगितले. बोंढार येथील मलशुद्धीकरण व एलिचपूर येथील मलशुद्धीकरण प्रकल्प पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बायो आॅक्सिजन डिमांडची मात्रा पाण्यात ३० पीपीएमपर्यंत असेल तर त्यात अंघोळ करणेही योग्य नसल्याचे सांगितले. पाहणी दौऱ्यात सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे व कार्यकारी अभियंता झंवर यांनी त्यांना माहिती दिली

मान्सूनप्रमाणे पीक पद्धत बदला
काही वर्षांपासून देशात मान्सूनचे चक्र बदलत आहेत. या बदलत्या मान्सून चक्रासोबत जोपर्यंत शेतकरी आपली पीक पद्धत बदलत नाही तोपर्यंत त्याची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, असे मत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पूर्वीच्या काळी जून महिन्यात सुरू होणाऱ्या पावसापासून पुढच्या एप्रिलपर्यंतचा अंदाज बांधून शेतकरी पीक घेत होते; परंतु आता ते चक्र बदलले आहे. आता पाऊसच होत नाही. हवामान खाते सांगते जोरदार पाऊस होणार त्या दिवशी पाऊसच होत नाही.

नांदेड येथे सोमवारी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहजी यांनी गोदावरीचे प्रदूषण पाहून त्यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, माजी नगरसेविका अरुंधती पुरंदरे आदी होते. छाया: सतीश शर्मा