आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणाचा फैसला आता सुप्रीम कोर्टात होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर : नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्षपद आरक्षणासंबंधी न्यायालयीन प्रक्रियेचा फेरा संपता संपत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यामुळे गल्लीतील निवडणुकीचा अंतिम फैसला राजधानी दिल्लीत होणार आहे.
बाजार समितीच्या भुसार धान्य खरेदी केंद्रात मापाडी असलेल्या रवींद्र पगारे यांनी नगराध्यक्षपद आरक्षणावर सर्वाेच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. दीड महिन्यापासून नगराध्यक्षपद आरक्षणाचा तिढा न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाली काढल्यामुळे निवडणूक प्रक्रियेची तारीख जाहीर होईल,
अशी शक्यता निर्माण झाली असताना नगराध्यक्ष आरक्षणाचा चेंडू सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना न्यायालयात सुनावणीनंतर येणाऱ्या निकालाची काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, खंडपीठातील निर्णयानंतर निवडणुकीची तारीख कधी जाहीर होते याकडे सर्व राजकीय पक्षांचे दुसऱ्या फळीतील नेते लक्ष ठेवून आहेत.
बातम्या आणखी आहेत...