आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालीमठच्या महाराष्ट्र बँकेत चोरी, १४ लाखांची रोकड लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या इमारतीला असलेल्या खिडकीचे ग्रील कापून चोरांनी बँकेत प्रवेश करत तिजोरीतील १३ लाख ६९ हजार २६२ रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना कन्नड तालुक्यातील कालीमठ येथे बुधवारी पहाटे घडली. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाल्याचे पाहावयास मिळत आहे. याप्रकरणी कन्नड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग २११ पासून दोन कि. मी आत कालीमठ हे गाव आहे. याठिकाणी १९९२ मध्ये बँक आफ महाराष्ट्रची शाखा सुरू करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास १२ हजारांहून अधिक ग्रामस्थांचे बँकेत खाते आहे. बुधवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास बँक कर्मचारी गणेश तुपके हा बँकेची साफसफाई करण्यासाठी गेला असता मुख्य दरवाजा उघडताच त्यास आत सर्वत्र अस्ताव्यस्त सामान पडल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ या घटनेची माहिती नागरिकांना सांगितली. त्यानंतर यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांनादेखील माहिती सांगितली. सहायक पोलिस निरीक्षक सपना शहापूरकर, पोलिस उपनिरीक्षक रोहित ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बातम्या आणखी आहेत...