आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी शहरात कानशिलावर रिव्हॉल्व्हर लावून 25 लाख लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - शहराच्या अत्यंत वर्दळीच्या मध्यवर्ती भागात स्टेशन रोडवर असलेल्या कुरियर एजन्सीच्या चालकाच्या कानशिलावर रिव्हॉल्व्हर लावून 27 लाख रुपयांची रोख लांबवण्याचा प्रकार बुधवारी (दि.सात) सायंकाळी सातच्या सुमारास घडला. पोलिसांनी लगेचच केलेल्या नाकेबंदीत दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

स्टेशन रस्त्यावर नारायण चाळ कॉर्नरवर असलेल्या विसावा हॉटेलच्या तळमजल्यावर नंदीग्राम कुरियर एजन्सी आहे. एजन्सीचे संचालक राधाकिशन डोंबे बुधवारी सायंकाळी काम करीत होते. हवाला व्यवहारातील 20 ते 25 लाख रुपयांची रक्कम मोजणी करून ती बाहेर पाठवण्याचे काम केले जात असताना सायंकाळी सात वाजता तिघे दुकानात घुसले. त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत रक्कम हातोहात लांबवली. चोरटे ताबडतोब वाहनाद्वारे फरार झाले. या प्रकारानंतर या कॉम्प्लेक्समध्ये एकच गदारोळ उडाला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलिस उपअधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.