आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचा प्रयत्न; आरोपीस पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात फिरणार्‍यास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सहा ते सात दरोडेखोर ग्रामस्थांच्या तावडीतून फरार झाले.

लासूरगाव येथील देवी दाक्षायणी देवी मंदिराच्या पाठीमागे रात्री 9 वाजेच्या सुमारास सहा ते सात जणांची टोळी फिरताना दिसली. ग्रामस्थांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. या वेळी ग्रामस्थांनी राजू प्रकाश शिंदे (रा. सलगरा, ता. अहमदपूर) यास पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून कुर्‍हाड जप्त करण्यात आली.

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एन. एम. मेहेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू शिंदे याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. जाधव करत आहेत.