आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third Offender Arrested In The Connection Of Fire On Police

पोलिसावरील गोळीबारप्रकरणी तिसरा आरोपीही जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - प्रतिबंधात्मक कारवाई करू नये, यासाठी शिवाजीनगर ठाण्याचे कर्मचारी श्रीमंत मुरकुटे यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी मच्छिंद्र काटकर (रा.पालवण चौक) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. गोळीबारात वापरलेले गावठी बनावटीचे खडकीमेड रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केले आहे.

पालवण चौकातील मधुर बिअरबारमध्ये 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12.45 दरम्यान श्रीमंत मुरकुटे हे मित्रासमवेत जेवत होते. संजय अण्णासाहेब भडगळे व विकास अशोक मस्के, मच्छिंद्र काटकर हे तिघे तिथे आले. संजयने प्रतिबंधक कारवाईवरून मुरकुटे यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ती गोळी मुरकुटे यांच्या डाव्या खांद्याला चाटून भिंतीत घुसली. जखमी अवस्थेतील मुरकुटे यांना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या जबाबावरून शिवाजीनगर ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला.

शिवाजीनगरच्या पथकाने भडगळे व मस्के या दोघांना तत्काळ पकडले. घटनास्थळी पोलिसांना कुकरी व गोळीचे टोपण, भिंतीत घुसलेली गोळी सापडली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम.एच-06 एडी 9462) पोलिसांनी जप्त केली आहे. सोमवारी दोघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. संजय भडगळे याने त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर धानोरा रोड येथील जमीन प्लॉट खरेदी-विक्रीच्या आर्या डेव्हलपर्स येथून पोलिसांनी जप्त केले आहे. हे रिव्हॉल्वर खडकी मेड असून त्याची बाजारातील किंमत सुमारे 17 हजार आहे.