आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरला रेल्वेने आली पाण्याची तिसरी खेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मिरजेहून पाणी घेऊन निघालेली तिसरी रेल्वे (जलदूत) लातूर स्थानकावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पोहोचली. दहा वॅगनमधून पाच लाख लिटर पाणी या रेल्वेने आले.
यापूर्वी मंगळवारी पहाटे आणि बुधवारी सायंकाळी रेल्वेने पाणी आले होते.
रेल्वेस्थानकाशेजारील विहिरीत साठवून तेथून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यात आले. जलशुद्धीकेंद्रातून ते टँकरद्वारे नागरिकांना पुरवले जाईल. दरम्यान, रेल्वेचे आगमन झाल्यानंतर पाणी उतरून घेण्याच्या आणि वाहून नेण्याच्या कामाची पाहणी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केली. या वेळी उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसीलदार संजय वारकड, महापालिका उपआयुक्त संभाजी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रेल्वेला जलद गाडीचा दर्जा देण्यात आला आहे. मिरजेहून रेल्वे निघाल्यानंतर तिच्या प्रवासावर सोलापूरचा रेल्वे विभाग लक्ष ठेवून असतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
बातम्या आणखी आहेत...