आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thirteen Lakh People Can Get Benefit Of Food Security Bill

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेरा लाख लोकांना मिळू शकेल अन्नसुरक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - बहुचर्चित अन्न सुरक्षा विधेयकावरून लोकसभेत मंजूर झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक मांडल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील 13 लाख लोकांना लाभ होणार आहे.


या कायद्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 75 टक्के तर शहरी भागातील 50 टक्के नागरिकांना अत्यल्प दराने धान्य मिळणार आहे. योजनेचा देशातील 81 कोटी जनतेला लाभ होणार आहे. जालना जिल्ह्याचा विचार करता 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 19 लाख 59 हजार 46 इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 लाख 75 हजार242 नागरिकांना लाभ होणार आहे.

शहरातील लाभार्थी : जिल्ह्यातील 3 लाख 77 हजार 508 नागरिक शहरी भागात राहतात. त्यापैकी 1 लाख 88 हजार 704 नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. यातील 28 } म्हणजेच 1 लाख 5 हजार 702 लोक प्राधान्य गटात तर 22 म्हणजेच 83 हजार 51 नागरिक सर्वसाधारण गटात येतील, असा प्राथमिक अंदाज आहे.