आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thorugh Political Activists Ashok Chavan Show Power

अशोक चव्हाणांचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आदर्श प्रकरणामुळे राजकीयदृष्ट्या अडचणीत असलेल्या चव्हाणांनी तीन वर्षांत कधीही आक्रमक पवित्रा घेतला नाही; परंतु या मेळाव्यात हे सर्व षड्यंत्र असल्याचा आरोप करून योग्य वेळी यामागे कोणाचे हात आहेत, हेही जाहीर करू, असे सांगितले. त्यामुळे या मेळाव्याच्या आयोजनाचा मुख्य उद्देश काय, याची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.
आदर्शप्रकरणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या प्रकरणावर जाहीर भाष्य करण्याचे अशोक चव्हाणांनी टाळले. या प्रकरणी त्यांच्यावर स्वपक्ष, मित्रपक्ष आणि विरोधकांकडून जाहीर आरोप झाले तरीही त्यांनी याबाबत अवाक्षरही काढले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा घेऊन यावर आक्रमकपणे भाष्य केले. काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. जिल्ह्यात आपल्यामागे किती ताकद आहे, हे मेळाव्याच्या निमित्ताने दाखवतानाच त्यांनी आपल्यावरील आरोपांनाही चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यामागे लोकसभा लढवण्याची त्यांची तयारी असावी, अशी चर्चा आहे. मात्र, मेळाव्यात लोकसभेच्या उमेदवारीबाबत थेट भाष्य करण्याचे टाळत पक्षर्शेष्ठी देतील तो उमेदवार विजयी करू, असे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यात पर्याय नाही
मराठवाड्यात अशोक चव्हाण हे काँग्रेसचे नंबर एकचे नेते आहे. विलासरावांनंतर मराठवाड्यात जनाधार असलेले ते एकमात्र नेते आहेत. त्यांना दुर्लक्षित केले तर मराठवाड्यात काँग्रेसला फटका बसू शकतो. राज्यात संपूर्ण काँग्रेसमय असलेला नांदेड हा एकमात्र जिल्हा आहे. (खासदार, आमदार, जिल्हा परिषद, मनपा सर्व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.) त्याचे र्शेयही चव्हाण यांनाच आहे. त्यांना शह देऊन काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देईल, असा अन्य नेता मराठवाड्यात सध्या तरी नाही. मोदी आणि आपमुळे राजकीयदृष्ट्या अडचणीत असलेला काँग्रेस पक्ष त्यांना बाजूला ठेवेल, अशी शक्यता नाही; परंतु काँग्रेसची मोठी अडचण आहे.
आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण न्यायालयीन लढाईत फसले आहेत. न्यायालयातून क्लीन चिट मिळवणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. त्याशिवाय त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे काँग्रेसलाही कठीण आहे. अन्यथा विरोधक त्याचा बाऊ करून पक्षाला अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
शक्तिप्रदर्शन नाही
सोमवारचा मेळावा हा शक्तिप्रदर्शन नाही. जिल्ह्यात आणि मराठवाड्यात काँग्रेसची शक्ती आहेच. तिचे प्रदर्शन करण्याची आम्हाला काही गरज नाही. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील तळागाळात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना कामाला लावण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री