आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेवराईमधील अपघातात औरंगाबादचे तिघे ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - बीडहून औरंगाबादकडे जाणा-या तवेराची बीडकडे येणा-या बसशी धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. मृत औरंगाबादचे आहेत. यात इतर सात जण जखमी झाले. रविवारी रात्री 8:30 वाजता बागपिंपळगाव फाट्यावर हा अपघात झाला. राजेंद्र शिवाजी देशमुख (50), त्यांच्या पत्नी राजश्री (45) व सरोजिनी कमलाकर कुलकर्णी (70) अशी मृतांची नावे आहेत. प्रशांत कुलकर्णी (लहुरी, ता. केज) यांच्या सासुरवाडीला परंडा येथे मुलीच्या बारशाचा कार्यक्रम होता. तो आटोपून तवेराने (एमएच 04 डीई 2027) दहा जण परतत होते. बसच्या (एमएच 20 बीएच 2685) धडकेनंतर दोन्ही वाहने खड्ड्यात पडली. यात एका पाच वर्षीय मुलासह मंजूषा मुकुंद कुलकर्णी, योगिनी अतुल कुलकर्णी, माया देशमुख, मधुमती मुकुंद कुलकर्णी, पायल राजेंद्र देशमुख (औरंगाबाद), दिगंबर सखाराम खोबरे (बीड), तवेराचालक सुनील चव्हाण (कंधार) जखमी झाले. त्यांना औरंगाबादला हलवण्यात आले आहे. पावसामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.