आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात तीन कोटींचा गुटखा जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/बीड/नांदेड - मराठवाड्यातील जालना, बीड व नांदेड येथे अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी बुधवारी गुटखा जप्तीची कारवाई केली. यात सुमारे 3 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जालन्यात एमआयडीसीत केतन गुटखा कंपनीवर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेने 1.12 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत ही कारवाई सुरू होती.
केजमध्ये घरात दडवलेला सुमारे 2.5 लाखांचा 23 पोती गुटखा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी कासीम तांबोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेडात दोन ट्रक गुटखा : नांदेडात गुरुद्वारा गेट क्र. 2 भागात बुधवारी सायंकाळी नरसिंग ओझा यांच्या मालकीचा दीड कोटी रुपयांचा गुटखा पकडला. जप्त करण्यात आलेला गुटखा दोन ट्रक भरून असून त्याचे बाजारमूल्य दीड कोटी रुपये असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

तक्रारीनुसार कारवाई
जालना येथील एका कंपनीत गुटखा उत्पादन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या धाडी टाकण्यात आल्या. त्या-त्या ठिकाणच्या पोलिस अधीक्षकांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली.’
सतेज पाटील, गृह राज्यमंत्री