आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक लागल्याने तीन वेळा कार उलटून तिघा मित्रांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- नंदागौळ येथून परळीकडे जाणाऱ्या  चालकाचा कारवरील  ताबा सुटल्याने भरधाव कार उलटूून  झालेल्या अपघातात चालकासह तीन जण जागीच ठार झाले. एक जण जखमी झाला. हा अपघात नंदागौळ- परळी मार्गावरील पादुका घाट परिसरात  गुरुवारी रात्री आठ वाजता  घडला.  

परळी तालुक्यातील नंदागौळ येथील  कार चालक  नितीन लक्ष्मण गिते (३०), गणेश अरुण गित्ते (२४), जगन्नाथ उद्धव गित्ते (२५) अशी मृतांची नावे आहेत. महादेव जगन्नाथ गित्ते  (१७) हा गंभीर जखमी झाला. हे चार मित्र नंदागौळ येथून कारने परळीकडे निघाले होते. वाटेत  पादुका घाटाजवळील शिवारात कारचे जोराचे ब्रेक लागल्याने कार रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात दोन वेळा उलटली. भरधाव असल्याने पुन्हा रस्त्यावर येऊन कार तिसऱ्यांदा उलटली. 

या अपघात तिघे घटनास्थळी ठार झाले. गंभीर जखमी झालेला महादेव जगन्नाथ गित्ते याला ग्रामस्थांनी कारमधून बाहेर काढत परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले.  

सुटीवर आला होता सैनिक
या अपघातात ठार झालेला नितीन गित्ते हा बीड येथील एसटी वर्कशॉपमध्ये  मेकॅनिक होता. त्याचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. त्याला एक मुलगा असून गुरुवारी  नितीनचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट मंजूर झाल्याने सर्व मित्र परळीकडे निघाले होते. या अपघातातील दुसरा मृत जगन्नाथ उद्धव गित्ते हा भारतीय सैन्य दलात सैनिक असून तो एक महिन्याच्या सुटीवर गावी आला होता. यातील जखमी महादेव गित्ते यांच्यासह मृत गणेश गित्ते व सैनिक जगन्नाथ गित्ते हे तिघे अविवाहित होते.   
 
तीन मृतदेहांची आज उत्तरीय तपासणी   
घटनास्थळी अपघातातील गंभीर जखमी  महादेव जगन्नाथ गित्ते हा हालचाल करू लागल्याने ग्रामस्थांनी अंबाजोगाई येथील  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाची वाहिका बोलावून घेतली. त्यांना रुग्णवाहिकेत  बसवले. त्यानंतर अपघातात ठार झालेल्या तिघांचे  मृतदेहही स्वारातीत आणण्यात आले. तिन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी  शुक्रवारी स्वाराती रुग्णालयात  होणार आहे.  

नुकतीच खरेदी केली होती कार
नंदागौळ येथील नितीन गित्ते यांनी नुकतीच औरंगाबाद येथून  जुनी कार (एमएच २० डीएन ४२७३) खरेदी केली होती. चारही मित्र आज नंदागौळ येथून परळीकडे निघाले होते. दरम्यान, काळाने हा घाला घातला.
बातम्या आणखी आहेत...