आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरजवळ कार उलटून औरंगाबादचे तीन ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- ठाणे येथे उपचारासाठी जात असताना सिन्नर-शिर्डी मार्गावर झायलो ही कार उलटून औरंगाबादचे तिघेजण जागीच ठार तर पाचजण जखमी झाले. गुरुवारी (दि. 18) पहाटे तीन वाजता हा अपघात झाला.

चालकाचा ताबा सुटल्याने झायलो (एमएच 20, सीएच 3562) कार जागीच उलटली. यात रामा धोंडिराम मासुळे (40), वत्सलाबाई देवीदास मासुळे (35), गोरख गोविंद पवार (40, सर्व रा. एमआयडीसी, वाळूज, जि. औरंगाबाद) हे तिघे जागीच ठार झाले. अपघातात अंकुश गोविंद धोत्रे (50), देविदास धोंडिराम मासुळे (40), केशरबाई अंकुश धोत्रे (40), हिरामण तुकाराम राठोड (50), कांताबाई रामू मासुळे (सर्व रा. शहाजापूर, जि. औरंगाबाद) हे जखमी झाले. चार जखमींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात तर कांताबाईवर मासुळेंवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. दुर्घटनेच्या वेळेस कारमधील बहुतेक प्रवासी निद्रावस्थेत होते. कार रस्त्यावर आदळल्यानंतर तिचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले.