फोटो - एकजण तरुणीच्या पोटात लाथ घालत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
लातूर - संस्कृती रक्षणाच्या नावाखाली तरुण तरुणीला मारहाण केल्याचा खळबळजनक व्हिडिओ काल प्रसारमाध्यमांमधून समोर आला. या प्रकरणात मारहाण करणा-या तरुणांचा पोलिसांना शोध लागला आहे. लातूरच्या 'गनिमी कावा' संघटनेच्या तरुणांनी हा प्रकार केल्याचे उघड झाले असून या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघे अद्याप फरार आहेत.
गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांना दिला त्यानंतर या आरोपींचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू झाला होता. लातूर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौकशी करून तिघांना ताब्यात घेतले आहे. तर सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितीन गोडसे, अमोल गोडसे, संदीप गोडसे अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. तर अक्षय बनसोडे, बालाजी गोडसे आणि राकेश गोडसे हे तिघे फरार आहेत.
बघ्यांची माणुसकी गेली कुठे?
ही घटना सुरू असताना याठिकाणी सुमारे 25 ते 30 जण बघ्याच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच याठिकाणाहून एका दुचाकीवर दोघे गेल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. म्हणजेच अशा प्रकारे आजुबाजुला लोक असतानाही असे प्रकार घडत असल्याने बघ्याच्या भूमिकेत असणा-यांची मानसिकता कुठे गेली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुढील स्लाइड्वर पाहा Photo आणि अखेरच्या स्लाइड्वर पाहा Video