जालना- डिझेल इंजिन दुरुस्त करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या पिता-पुत्रासह तिघांचा डिझेल इंजिनच्या धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील दैठणा गावात आज (मंगळवार) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये पिता-पुत्रासह गावातील अन्य एका युवकाचा समावेश आहे. तर या तिघांना वाचविण्यासाठी गेलेले इतर तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
बाबासाहेब बापुराव वाबळे (वय-45), रामेश्वर बाबासाहेब वाबळे (वय-30) व अर्जुन साहेबराव धांडे (तिघेही दैठणा, ता.घनसावंगी) अशी मृतांची नावे आहेत. महावितरणने शेतीपंपाची वीज बंद केल्याने पिकांना पाणी देण्यासाठी या बाबासाहेब वाबळे यांनी त्यांच्या शेतावरील विहिरीवर डिझेल इंजिन बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी बाबासाहेब वाबळे, रामेश्वर वाबळे, अर्जुन धांडे व परमेश्वर बाबासाहेब वाबळे हे चौघे विहिरीत उतरले होते.
इंजिन सुरु होताच त्याच्या धुरामुळे त्यांचा श्वास गुदमरला दरम्यान त्याचवेळी इंजिनसह हे चौघेही विहिरीत पडले. त्यात बाबासाहेब वाबळे,रामेश्वर वाबळे व अर्जुन धांडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर परमेश्वर वाबळे व त्यांना वाचविण्यासाठी गेलेले आसाराम बापुराव वाबळे हे दोघे जखमी झाले असुन त्यांच्यावर जालना शहरातील खासगी रुगणालयात उपचार सुरु आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..