आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात आत्‍महत्‍या सुरूच, नापिकी आणि कर्जामुळे तीन शेतक-यांच्‍या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड/ खुलताबाद - औरंगाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जामुळे आत्महत्या केली.खुलताबाद तालुक्यातील वडोदखुर्द येथील अंबादास त्र्यंबक लग्गड (६५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्रीपासून अंबादास हे घरातून बेपत्ता होते.

त्यानंतर बुधवारी सकाळी वडोदखुर्द येथे गट क्र. २२ मधील त्यांच्याच शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील करेवाडी येथील शेतकरी राजाभाऊ गणपती कांबळे यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील प्रभाकर नामदेव इंगोले (३२) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

लग्गड अनुदानास पात्र
-दुष्काळी परिस्थितीत लग्गड यांच्या शेतातल्या कापसाचा पंचनामा करण्यात आला आहे. हा शेतकरी अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी म्हणून पात्र आहे. शासनाचा अध्यादेश जारी झाल्यानंतर मृत शेतकऱ्याला नियमाप्रमाणे अनुदान दिले जाईल.
सचिन भिंगारे, तलाठी, वडोद (खुर्द)