आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 24 तासांत तीन शेतकऱ्यांची आत्महत्या, बीडमध्ये दोन, तर नांदेडमधील एक घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड/ शिरूर/ नांदेड - नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात बीड जिल्ह्यातील दोघे आहेत. बीडच्या केज तालुक्यातील नांदूरघाट येथे अरुण विश्वनाथ जाधव (४९) यांनी कर्जबाजारीपणामुळे सोमवारी पहाटे घराशेजारील गायवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तीन एकर जमीन आहे. अरुण यांच्या पुतणीचे २ मे रोजी लग्न आहे, हे विशेष. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. दुसरी घटना शिरूर तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथे घडली. दिगंबर जोगदंड यांनी रविवारी रात्री घरातील आडूला गळफास लावून आत्महत्या केली. दिगंबर यांनी वडील शिवाजी जोगदंड यांच्या नावे बीड येथील महाराष्ट्र बँकेकडून पीक कर्ज घेतले होते.

दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील हबळ येथील किसन शंकर कागणे (३८) या शेतकऱ्याने रविवारी रात्री शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.