आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Farmers Commit Suicide Due To Unproductive Farming

नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या तीन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदनापूर/फुलंब्री - नापिकीमुळे कर्जबाजारी विठ्ठल अंबादास मोरे (३०) या शेतकऱ्याने वीजपुरवठ्याच्या रोहित्रावर चढून जीवनयात्रा संपवली. बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे शनिवारी हा प्रकार घडला. तसेच रावसाहेब काशीनाथ करडे (४०, गणोरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) व शंकर महादू दौड (नाटवी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) या दोन्ही शेतकऱ्यांनीदेखील आत्महत्या केली.

विठ्ठल मोरे यांची धामणगाव येथे तीन एकर शेती आहे. मात्र, तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीतून काहीच उत्पन्न हाती लागले नाही. त्यातच त्यांच्यावर इंडियन ओव्हरसीज बँकेचे ६२ हजार रुपये, तर अलाहाबाद बँकेचे १ लाख ३९ हजार रुपये कर्ज होते. कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न काही दिवसांपासून त्यांना सतावत होता. त्यातच त्यांनी शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावाजवळील रोहित्रावर चढून आत्महत्या केली. उच्च दाबाच्या वीजप्रवाहाने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला हाेता. मोरे यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.

निलगाईंचा उपद्रव; शेतकरी आत्महत्या
शिवना | बटईने केलेल्या वीस एकर शेतातील कोवळी पिके मध्यरात्री निलगाईच्या कळ्पाने फस्त केली. त्याचा धसका घेऊन कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. शंकर महादू दौड (नाटवी ता.सिल्लोड) असे त्याचे नाव आहे. दौड हे शुक्रवारी मका, कापूस, सोयाबीनची मचाणवर रखवालदारी करत होते. तासभर त्यांंचा डोळा लागताच निलगाईंनी पिके उद्ध्वस्त केली. त्यांनी याचा धसका घेतला व शेतातील झोपडीत सकाळी आठ वाजता गळफास घेतला.