आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील तीन शेतक-यांची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : पवार
लातूर - कर्ज व नापिकीला कंटाळून मरणाला कवटाळण्याचे सत्र सुरूच असून याच कारणापोटी गुरुवारी औसा तालुक्यातील बोरफळ, चाकूर तालुक्यातील सुगाव आणि कन्नड तालुक्यातील चापानेर येथील शेतक-याने आत्महत्या केली. गोविंद तुकाराम वाघमारे (४०), सूर्यकांत गंपू मुडे (४०) व नारायण पवार (३७) अशी मृत शेतक-यांची नावे आहेत.

बोरफळ येथील गोविंद यांना आठ एकर शेती आहे. त्यांच्या नावावर ६० हजारांचे बँकेचे कर्ज होते. शेतात उत्पन्न चांगले निघावे म्हणून हातउसने पैसे घेऊन त्यांनी बोअर घेतला होता व ऊस लागवडही केली होती. तथापि, अचानक बोअरचे पाणी गेल्याने व ऊस वाळत चालल्याने ते धास्तावले होते. कर्ज कसे फिटणार व प्रपंच कसा चालणार? या विचाराने ते अस्वस्थ झाले होते. गुरुवारी शेतातील उंबराच्या झाडास त्यांनी गळफास घेतला. गोविंद यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुगाव येथील सूर्यकांत यांना अडीच एकर शेती आहे. नापिकीने तेही धास्तावले होते. शेतातील आंब्याच्या झाडास मफलरने गळफास घेतला. सूर्यकांत मुडे यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, दोन अपत्ये असा परिवार आहे.
सततच्या नापिकीमुळे कन्नड तालुक्यातील चापानेर येथील तरुण शेतकरी बाळासाहेब नारायण पवार (३७) यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.