आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन शेतकर्‍यांची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन - तालुक्यात दोन शेतकर्‍यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. कठोरा जैनपूर येथील भाऊसाहेब महादू कोठाळे यांनी शनिवारी विष प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांना प्रथम भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथोमोपचारानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. भाऊसाहेब कोठाळे यांच्याकडे खासगी सावकार आणि काही बँकेचेही कर्ज होते.

दुसर्‍या घटनेत कोसगाव येथील शेतकरी केशव शिवनारायण शिंदे यांनी विषऔषध प्राशन केले. त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील एकनाथ बाळा खिल्लारे (३९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.