आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरही तीन जिवलग मित्रांची तुटली नाही दोस्ती; पोहण्यास गेलेल्या मित्रांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर- दुधना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे घडली. शेख मिनाज शेख सलीम बागवान (२७), शेख सरताज शेख युसूफ बागवान (२५) आणि जावेद खान पाशा खान पठाण (३१) अशी मृतांची नावे आहेत.

हे सर्व रांजणी येथील रहिवासी असून जिवलग मित्र. पाण्यात बुडतानाही तिघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. अगदीच मरणाच्या दारातही त्यांनी मिठी मारून ही दोस्ती तुटायची नाही, असा अखेरचा संदेश देऊन जगाचा निरोप घेतला.

रांजणी येथील पाच मित्र पोहण्यासाठी रांजणीपासून जवळच असलेल्या दुधना नदीत पोहण्यासाठी गेले होते. त्यातील तिघांना पोहता येत नव्हते. त्यातच त्यांना नदीतील डोहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत पोहत असलेले साजेद शेख आणि नासेर तांबोळी यांनी तातडीने बाहेर येऊन रस्त्यावरील लोकांना याची माहिती दिली. यानंतर काही लोकांनी लगेच त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हे तिघेही बुडाले होते. या प्रकाराची माहिती मिळताच रांजणी आणि परिसरातील हजारो लाेकांनी घटनास्थळी धाव घेतली. साडेतीन तासांच्या शोधमोहिमेनंतर ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह शोधण्यात यश आले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा ते तिघेही एकमेकांना घट्ट मिठी मारूनच मृत्यूला सामोरे गेल्याचे दिसून आले. रांजणी येथील शेख मिनाज शेख सलीम बागवान, शेख सरताज शेख युसूफ बागवान, जावेद खान पाशा खान पठाण, साजेद शेख आणि नासेर तांबोळी हे पाचही जण चांगले मित्र होते. मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पोहायला जाण्याचे ठरवले. यापैकी शेख सलीम, शेख सरताज आणि जावेद खान या तिघांना पोहता येत नव्हते तरी ते दुधना नदीत उतरले. पाण्याचा अंदाज आल्याने डोहात ते बुडाले. दोघांनी त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.
बातम्या आणखी आहेत...