आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पो-जीप अपघातात तीन ठार; चार जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- लातूर राज्यमार्गावर मुसलमानवाडी पाटीजवळ भरधाव टेप्पोने जीपला जोराची धडक दिल्याने जीप चालक व दोन प्रवासी जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि.२९) दुपारी घडला. जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून  दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

नांदेड येथील पाटबंधारे विभागाची जीप (एमएच २६ सी ४७०३) घेऊन चालक निवृती तुकाराम वाघमारे (५५, रा. सिद्धार्थनगर) हे  कंधारकडे निघाले होते.  या वेळी लोह्याकडून येणाऱ्या टेप्पोने (एमएच २२ए ए ०४९१) जीपला समोरून जोरात धडक दिल्याने या भीषण अपघातात जीपचा समोरील भाग चेदामेंदा झाला . यातील मुद्रिका दत्ता नागरगोजे (६०) व मंच्छीद्र माधव नागरगोजे (१०) रा. घुगेवाडी ता. कंधार यांच्यासह चालक निवृती तुकाराम वाघमारे हे जागीच ठार झाले. तर दोघे जण  काही अंतरावर फेकले गेले.  जखमींत नाळेश्वर येथील नानाराव वाघ (४५), भीमराव वाघ (५९), लोहा तालुक्यातील रमनेवाडी येथील दत्ता  केंद्रे (५२), शिवकांता दत्ता केंद्रे यांचा समावेश आहे.  त्यांच्यावर  विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील केंद्रे दांपत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

अपघात घडताच पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक बनकर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, सोनखेडचे सपोनि व्ही. एच. काकडे, उपनिरिक्षक कल्याण नेहरकर, तांबोळी व कर्मचाऱ्यानी घटनास्थळी भेट देऊन  मृत व जखमींना शासकीय रुग्णालयात हलवले. अपघातानंतर  टेप्पोचालक पसार झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यत   टेप्पो चालकाविरुध्द गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती . 
बातम्या आणखी आहेत...