बर्दवान (पश्चिम बंगाल) - लातूर येथून गंगासागरच्या तीर्थयात्रेसाठी पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या भाविकांच्या बसला बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. ही दुर्घटना बर्दवान जिल्ह्यातील फागुपूरजवळ घडली. राजामती बालशेट्टी (65), संजय दाखण (42) आणि अजय अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी काय सांगितले ?
या बाबत बंगाल पोलिसांनी सांगितले, ''महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील काही भाविक एका पर्यटन कंपनीच्या बसने बंगालमध्ये तीर्थयात्रेसाठी आले होते. त्यांचा प्रवास अंतिम टप्प्यात होता. बुधवारी सकाळी एका मालवाहू ट्रकसोबत त्यांच्या बसची भीषण धडक झाली. यात तीन जण जागीच ठार झाले. 17 जखमींवर जवळच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून, दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत''.
लातूरवर शोककळा
या अपघाताने लातूरवर शोककळा पसरली आहे. जखमी प्रवाशांच्या नावांची यादी अद्याप हाती आलेली नाही. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह महाराष्ट्रात कसे आणले जातील, याचा विचार सुरु आहे. राज्य सरकारने यात मध्यस्थीची भूमिका बजावावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)