आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड तालुक्यात तीन मोरांची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - फासे लावून तीन मोरांची हत्या करणा-या माजलगाव तालुक्यातील तालखेड गावच्या फासेपारध्याला पिंपळनेर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पकडून बीड वन विभागाच्या ताब्यात दिले. तालुक्यातील रंजेगाव शिवारात मोरांची हत्या करण्यात आली होती.


बीड तालुक्यातील रंजेगाव येथे पिंपळनेर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वाय. एन. जाधव व पोलिस हवालदार डी. ई. बिक्कड हे गुन्ह्याच्या तपासासाठी गेले होते. या गावातून पिंपळनेर ठाण्याकडे परतत असताना त्यांना बघून एक जण पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी पकडले असता त्याच्या
हातातील खताच्या पिशवीत तीन मोरांचे मृतदेह व फासा आढळला. पोलिसांनी तीन मृत मोर व आरोपी चव्हाण याला वन परिक्षेत्र अधिकारी सी. डी. सुरवसे, बीडचे वनपाल एस. पी. कदम, वनपाल आर. डी. शेलार, वनरक्षक टी. एस. पवळ या पथकाच्या ताब्यात दिले आहे.


स्थळ पंचनामा करणार
शवविच्छेदन अहवालानंतर मोरांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी वन विभागात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ठिकाणी मोर सापडले त्या ठिकाणचा स्थळ पंचनामा शनिवारी केला जाणार आहे.
एस. पी. कदम, वनपाल, वन विभाग, बीड