आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Police Catch For Collecting Money By Superitendent

वसुली करणा-या तिघा पोलिसांना अधीक्षकांनीच पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे तीन कर्मचारी नांदेड-हैदराबाद राज्य मार्गावर गाड्या अडवून वसुली करत असल्याचे खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांच्याच निर्दशनास आले. गुरुवारी या प्रकाराने खळबळ उडाली असून त्या कर्मचा-यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


नांदेड येथून हैदराबाद व लातूर-मुंबई-पुण्याकडे जाणारे महामार्ग नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. हैदराबाद व लातूर रस्त्यावर या ठाण्याचे पोलिस कर्मचारी गाड्या अडवून पैसे वसुली करत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठ अधिका-यांना मिळाल्या होत्या. गुरुवारी (11 एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक विठ्ठलराव जाधव नायगावकडे हैदराबाद रस्त्यावरून जात होते. त्या वेळी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी शिवाजी पुंडलिकराव शिंदे, रामबा मारुती फड व वाहनचालक कामाजी सटवाजी गंगोत्री हे तिघे काकांडीजवळ गाड्या अडवून चालकाकडून पैसे वसूल करत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या कर्मचा-यांची तिथे ड्यूटी नव्हती. ते कोणाच्या परवानगीने पेट्रोलिंग करत आहेत, असा प्रश्न पोलिस अधीक्षकांना पडला. शुक्रवारी सकाळी पोलिस ग्राउंडवर परेडच्या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी सर्वासमक्ष त्या कर्मचा-यांना फैलावर घेतले.


दोषींवर कडक कारवाई
काकांडीजवळ गाड्या अडवून तीन पोलिसांनी वसुली केल्याचा प्रकार घडला. ग्रामीणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी विनीता साहू यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.’’
तानाजी चिखले, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड