आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणकर्त्‍या महिलांना जाळण्याचा प्रयत्न; उदगीरमध्‍ये तीन जणांना गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन उपोषण करत असलेल्या महिलांना रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी उदगीर शहर ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला.  
 
शिवकुमार झेटिंगराव कांबळे असे आरोपीचे नाव असून, त्याचे अन्य दोन साथीदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सिद्धार्थ इंडस्ट्रियल को. ऑप. सोसायटीला सरकारने दोन कोटी ८० लाखांचा निधी दिला होता.  सदर रकमेत गैरव्यवहार झाला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी आपण उपोषण करत असताना कांबळे व त्याच्या साथीदारांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादी सविता बिरादार यांनी म्हटले आहे.  
 
उदगीर येथील सिद्धार्थ इंडस्ट्रियल को. ऑप. सोसायटीने शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप करत संस्थेची मान्यता रद्द करावी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, समाजकल्याण अधिकाऱ्यांना निलंबित करावे आदी मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून हे उपोषण सुरू आहे. सविता रमेश बिरादार, माया सखाराम शिंदे, शांता राजकुमार कांबळे, शांताबाई शिवाजी बोरगावे, विजय मसुरे , अविनाश कांबळे हे उपोषण करत आहेत. गुरुवारी रात्री उपोषणासाठी टाकण्यात आलेल्या मंडपात उपोषणकर्त्या झोपल्या असता मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली होती. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते.  

लावण्यात आलेल्या आगीमुळे उपोषणस्थळावरील गादी, चादरी आदी साहित्य जळाले होते. या संदर्भात सविता बिरादार यांनी जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार उदगीर दौऱ्यावर अालेले विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांच्याकडे शुक्रवारी केली होती. त्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
बातम्या आणखी आहेत...