आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अपघातांत १३ जखमी; ट्रकने दुचाकीसह पिकअपला ठोकरले, कामगारांचा ट्रक झाडावर आदळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूरहुन केज शहरात आलेला भरधाव ट्रक एका विटाच्या सेडमध्ये घुसल्याने नुकसान झाले. छाया : संतोष गालफाडे - Divya Marathi
धारूरहुन केज शहरात आलेला भरधाव ट्रक एका विटाच्या सेडमध्ये घुसल्याने नुकसान झाले. छाया : संतोष गालफाडे
बीड- धारूरहून केजकडे निघालेला ट्रक सुरुवातीला दुचाकी, पिकअप त्यानंतर एका विटांच्या शेडमध्ये घुसल्याने या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वारासह तीन बांधकाम कामगार जखमी झाले. हा अपघात केज- धारूर मार्गावरील गॅस एजन्सीजवळ घडला, तर ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत मुलाला परीक्षेसाठी सोडविण्यास निघालेला पिता केज तालुक्यातील नाव्होलीजवळ जखमी झाला.
 
पाटोदा तालुक्यात धनगर जवळका येथे बेलापूर साखर कारखान्याहून गावी परतणाऱ्या ऊसतोड कामगारांचा ट्रक झाडावर आदळून पुलाखाली कोसळला. यात आठ जण जखमी झाले असून त्यात तीन गंभीर आहेत. तिन्ही अपघात गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात घडले. 

धारूरहून केजकडे भरधाव येणारा ट्रक (एमएच ०९ क्यू ६८२०) ने केज शहरात प्रवेश केल्यानंतर समोरून दुचाकीला जाेराची धडक दिली. यानंतर घाईने पुढे जाणाऱ्या पिकअपला जोराची धडक दिल्यानंतर ट्रक विटा रचलेल्या शेडमध्ये शिरला. केज शहरातील गॅस एजन्सीजवळ झालेल्या तिहेरी अपघातात सुरुवातीला शेख सदाम शेख रशीद (२५, रा. केज) हा दुचाकीस्वार जखमी झाला. यानंतर घरावर ट्रक आदळल्याने बांधकाम कामगार अखिल खान (वय २६), इरफान मलिक शेख (वय ५०), सय्यद अजीम वजीर (वय २५, सर्व रा. परळी) हे चार जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अंबाजोगाईला पाठवण्यात आले. 

परीक्षेला सोडण्यासाठी गेलेला पिता जखमी
दुसरा अपघात केज तालुक्यातील नाव्होलीजवळ घडला. तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील नवनाथ लिंबाजी गालफाडे (वय ४०) हे गुरुवारी सकाळी दहा वाजता मुलाला परीक्षेसाठी नांदुरघाट येथे सोडण्यासाठी दुचाकीवर चालले होते. नाव्होलीजवळ पाठीमागून आलेाल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात नवनाथ गालफाडे यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून उपचारासाठी त्यांना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

तीन बैल, एक गाय दगावली 
पाटोदा तालुक्यातील धनगरजवळा येथे गुरुवारी सकाळी सहा वाजता जेव्हा ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला तेव्हा ट्रक झाडावर आदळून पुलाखाली कोसळला. या अपघातात दोन बैलांसह गाय ठार झाली. अन्य दहा गुरेही जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ऊसतोड कामगारांवर आर्थिक संकट ओढावले. 
 

अपघातात कामगार वाचले 
केज शहरात धारूरकडून केजकडे येणाऱ्या ट्रकने जेव्हा पहिल्यांदा दुचाकीला जोराची धडक दिली, तेव्हा दुचाकीचा चुराडा झाला. त्यांनतर पिकअप पलटी झाल्याने पाण्याचे जार रस्त्यावर पडले होते. त्यानंतर भरधाव ट्रक विटा रचलेल्या शेडमध्ये घुसला. या वेळी नाष्टा करणारे कामगार बचावले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. 

अपघातानंतर ट्रकचालक फरार 
बेलापुरी येथील सरोदा साखर कारखान्याहून गावी परतणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला. ट्रक पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे आला तेव्हा चालक कृष्णा ज्ञानदेव माने (रा. मानेवस्ती, ता.पाटोदा) याचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक लिंबाच्या झाडावर आदळून पुलावरून खाली पडला. या अपघातात जयसिंग भंडगर, गहिनीनाथ सानप, शिवाजी सानप यांच्या डोक्याला, शरीराला गंभीर मार लागला आहे, तर बारीकराव सानप, कविता सानप, उषा सानप, आशाबाई सानप, मनीषा भंडगर, मनोज सानप, प्रशांत सानप यांच्यावर पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक त्याचा सहकारी फरार झाला. 
 
पुढील स्लाइडवर पाहा ट्रक अपघाताचा फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...