आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेड काढल्यावरून वकिलाला मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- छेड काढल्याचा आरोप करत पक्षकार असलेल्या तीन महिलांनी वकिलाला मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली. आष्टी तालुक्यातील कडा येथील एका मुलाचा तीन वर्षांपूर्वी प्रेम प्रकरणातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

आपल्या मुलाला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप त्याच्या आईने केला होता. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. येथील एक वकील या प्रकरणी मुलाच्या आईची बाजू मांडत आहेत. सोमवारी सकाळी मृत मुलाची आई, बहीण मावशी न्यायालयात आले असता या वकिलाने बहिणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त महिलांनी न्यायालय आवारात वकिलाला मारहाण केली. त्यानंतर महिला वकिलानेही शिवाजीनगर ठाणे गाठले होते. मात्र, साेमवारी सायंकाळपर्यंत कोणताच गुन्हा दाखल झालेला नव्हता.