आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनकिन्होळा शिवारात बिबट्याचा वावर?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बनकिन्होळा - बिबट्यासारखे हिंस्र दिसणारे पाच प्राणी बनकिन्होळा शिवारात सोमवारी, दि. १२ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास दिसून आल्याने दहशत पसरली होती.

प्रथमदर्शनी पाहणाऱ्या कापूस वेचणाऱ्या महिलांनी माहिती दिली की औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून दोन मोठे व तीन पिल्ले असे पाच बिबट्यासारखे प्राणी लगतच्या कपाशीच्या शेताकडे येताना दिसले. त्यामुळे या महिला घाबरून शेतवस्तीकडे पळाल्या तशी माहिती त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना दिली.
ग्रामस्थांनी व पदाधिकारी यांनी तशी माहिती सिल्लोड वनविभाग व वडोदबाजार पोलिसांना कळवली. यानंतर वडोद बाजार पोलिस ठाण्याचे बीट जमादार ज्ञानदेव मेटे व सिल्लोड वनपरिक्षेत्राचे अधिकारी पी.डी. कोराळे व उपसरपंच यांच्या सहकाऱ्यांनी शिवारातील घटनास्थळी भेट देऊन सदरील प्राण्यांच्या पावलांच्या ठशांची पाहणी करून कोणत्या जातीचे प्राणी आहे यांची माहिती देता येऊ शकेल, असे कोराळे यांनी ग्रामस्थांना सांगितले. परंतु बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी, कापूस वेचणी करणाऱ्या महिलांत दहशतीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे.
बातम्या आणखी आहेत...