हिंगोली - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी दुपारी अडीच वाजता येथील बसस्थानकाजवळील मैदानावर प्रचारसभा होणार आहे. सभेचे ठिकाण निश्चित झाल्यानंतर पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणा-या पथकाने ठिकाणाचा ताबा घेतला असून पथकाच्या मार्गदर्शनाखाली सभामंडपाची आखणी केली जात आहे. सभेच्या बंदोबस्तासाठी बाराशेपेक्षा जास्त पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले आहेत.