आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 च्या पाश्वर्भूमीवर ‘सैनिकहो तुमच्यासाठी’; नांदेडला आज गीत-संगीत-नृत्याचा कार्यक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून होत असलेल्या पत्रकार विजय जोशी निर्मित ‘सैनिक हो तुमच्यासाठी....’ या गीत-संगीत-नृत्याचा अनोखा कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला अाहे. झी टीव्हीच्या लिट्ल चॅम्प अंजली व नंदिनी गायकवाड तसेच संगीत सम्राटमध्ये चमकलेला रवींद्र खोमणे हे या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. नांदेड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   


मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्वर्भूमीवर गेल्या नऊ वर्षांपासून देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी व ती  वृद्धिंगत करण्यासाठी पत्रकार विजय जोशी सैनिक हो तुमच्यासाठी....हा गीत-संगीत-नृत्याचा कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षीदेखील हा कार्यक्रम नांदेड येथे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

पुण्याच्या नृत्य कलावंतांचा आविष्कार
पुण्याच्या नृत्य कलावंतांचा अनोखा आविष्कार या कार्यक्रमात पाहावयास मिळणार आहे. प्रख्यात निवेदक गोविंद पुराणिक व नागपूरच्या वैशाली करडे पाळेकर या दोघांच्या दर्जेदार निवेदनात हा कार्यक्रम होणार आहे. नांदेड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेनेदेखील सहकार्य केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...