औरंगाबाद - बीड, लातूर, परभणी, नांदेड आणि औरंगाबाद अशा पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील संचालक पदांसाठी मंगळवारी मतदान होईल. बीडमध्ये संचालकांच्या १९ पैकी पाच जागा बिनविरोध निघाल्या आहेत. १४ जागांसाठी मतदान होईल. नांदेडमध्ये २१ जागांसाठी निवडणूक होईल. लातुरात १९ संचालकांपैकी १३ जण बिनविरोध निवडून आले असून उर्वरित सहा जागांसाठी मतदान होणार आहे. परभणीत सहा जागा बिनविरोध निघाल्या
असून १५ जागांसाठी मतदान होईल. औरंगाबादेत २० पैकी १५ जागांसाठी मतदान होईल.