आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी यांची आज लातुरात सभा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघापासून दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची बुधवारी, 9 एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुलात सभा होणार आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. महायुतीतील भाजपचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांच्या प्रचारार्थ दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे. पक्षाच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एक लाख लोक सभेला येतील, असे गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे. नांदेडनंतरची मोदी यांची मराठवाड्यातील ही दुसरी सभा आहे. विशेषम्हणजे ही सभाही काँग्रेस उमेदवाराविरोधातीलच आहे.

नरेद्र मोदींच्या महाराष्ट्रात आतापर्यंत सांगली, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, अकोला आणि नागपूर मध्ये प्रचारसभा झाल्या आहेत. या सर्व मतदारसंघात महायुतीची टक्कर काँग्रेसच्या उमेदवारांशी आहे. तसेच यानंतर सोलापूर आणि नंदुरबारमध्ये मोदींची सभा होणार आहे. येथेही भाजपची लढत काँग्रेस उमेवारांशी आहे. अमरावती वगळता मोदींनी राष्ट्रवादीच्या एकाही मतदारसंघात सभा घेतलेली नाही. यामागे वेगळेकाही राजकारण आहे का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.