आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनी मंगळसूत्र गहाण ठेवून बांधले 'टॉयलेट', महिलेचा प्रेरणादायी पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- स्वच्छ मिशनअंतर्गत प्रत्येक गाव पाणंदमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सोमनाथ या गावात स्वयंसेवी संस्था, नेहरू युवा केंद्राचे समन्वयकही ग्रामस्थांमध्ये जनजागृती करत आहेत. या प्रेरणेतून सोमनाथ येथील ग्रामस्थांनी गाव पाणंदमुक्त करण्याची शपथ घेतली. दरम्यान, पंधराच दिवसांत १०० स्वच्छतागृहे बांधण्यात आली असून, स्वातंत्र्यदिनी एका महिलेने मंगळसूत्र गहाण ठेवून स्वच्छतागृहाचे काम सुरू केले आहे. यामुळे या महिलेचा पुढाकार हा प्रेरणा देणारा ठरत आहे. 

सोमनाथ या गावाला दोन तांडे, एक वाडी संयुक्त असून, जवळपास २५० पेक्षा जास्त कुटुंबसंख्या आहे. दरम्यान, या गावात नेहरू युवा केंद्राचे समन्वयक गजानन गाढे, जनसाथी दुष्काळ निवारण मंचअंतर्गत चेतना स्वयंसेवी संस्थेतील पदाधिकारी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत. या जनजागृतीतून ग्रामस्थ प्रेरित होत आहेत. या उपक्रमासाठी सरपंच राजेश पवार, ग्रामसेविका अश्विनी पडघम, नारायण घुले, सुरेश एखंडे, बळीराम एखंडे, सुरेश गाढे, प्रकाश एखंडे, शिवाजी गाढे आदींनी पुढाकार घेत ३० ऑगस्टपर्यंत गाव पाणंदमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. गावातील हा उत्साह पाहून अर्चना प्रकाश एखंडेने मंगळसूत्र गहाण ठेवून स्वच्छतागृहाचे काम सुरू केले. 

ग्रामस्थांमध्ये संघटन 
गावाच्या विकासासाठी नेहरू युवा केंद्र तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गाव १०० टक्के पाणंदमुक्त करत आहे. ३० ऑगस्टपर्यंत गाव पाणंदमुक्त करण्याची ग्रामस्थांनी शपथ घेतली आहे. 
- गजाननगाढे, समन्वयक, नेहरू युवा केंद्र, जालना. 
बातम्या आणखी आहेत...