आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मिनी बसच्या अपघातात दोन ठार, ४४ जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- दोन ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन ठार, तर ४४ जण जखमी झाले. लातूर-बार्शी रोडवर बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर येथील शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही ट्रॅव्हल्स चालकांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

येथील नवीन एमआयडीसीत गणेश बेकरी हा कारखाना आहे. या कारखान्यात शहर व परिसरातील शेकडो महिला कामगार काम करतात. त्यांना आणण्या-नेण्यासाठी कंपनीच्या वतीने मिनी बस (एमएच २६ डी २०५) आहे. बस बुधवारी सकाळी नेहमीप्रमाने महिला कामगार घेऊन कारखान्याकडे निघाली होती. सकाळी सहा वाजता बार्शी रोडवर समोरून येणाऱ्या मिनी बसची (एमएच ०४ जे ७५९५) जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.