आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहताना दोन मुलांचा बंधाऱ्यात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- प्रातर्विधीस गेलेल्या तीन मुलांपैकी दोघे मातीनाला बंधाऱ्यात पोहताना गाळात अडकून मृत्यू पावले. तालुक्यातील आपेगाव येथे शुक्रवारी ही दुर्घटना घडली.

बकरी ईदच्या सुटीमुळे जि.प. शाळेतील अर्जुन शिंदे (१०), विजय जगताप (१०) आणि त्यांचा एक मित्र शिवारातील मातीनाला बंधारा भागात गेले होते. अर्जुन व विजय बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले. बंधाऱ्याकाठच्या बाभळीच्या मुळ्या धरून ते पोहत होते. नंतर मुळीला धरून पाण्यात उड्या मारू लागले. अचानक मुळी तुटली आणि दोघे गाळात जाऊन अडकले. ते वर येत नसल्याचे लक्षात येताच मित्राने गावात येऊन हा प्रकार सांगितला. ग्रामस्थांनी दाेरीच्या साह्याने बंधाऱ्यात उतरून रात्री उशिरा दोघांचे मृतदेह काढले.

उत्तरीय तपासणीनंतर शोकाकूल वातावरणात पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात हनुमंत जगताप यांनी दिलेल्या माहितीवरून नोंद झाली. या दुर्घटनेमुळे आपेगाव पंचक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.