आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिग्रस, रायपुरात नापिकीला कंटाळूून दोघांची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - सततच्या नापिकीला कंटाळून ४५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना डिग्रस येथे सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. रामा ऊर्फ रामदास लक्ष्मण तायडे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. रामा तायडे यांची डिग्रस शिवारात गट नं. १०८ मध्ये ७ एकर शेती आहे. त्यांच्याकडे स्टेट बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज होते. सततची नापिकी व वाढत चाललेले कर्ज कसे फेडावे या चिंतेने ते त्रस्त होते.
त्यामुळे त्यांनी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पानवडोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अजिंठा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
विषारी आैषध प्राशन करून आत्महत्या
बँक व खासगी कर्जामुळे अडचणीत आलेल्या ४२ वर्षीय एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रायपूर येथे शुक्रवारी घडली. साईनाथ आसाराम कीर्तिकर असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. भाऊबीजेनिमित्त पत्नी माहेरी गेलेली असताना शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. साईनाथ पाच लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगत होता.