आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड । गेवराई - बीड तालुक्यातील शहाजानपूर लोणी येथे गुरुवारी पहाटे चार वाजता कर्जबाजारी शेतकऱ्याने गोठ्यातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली तर गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे वृद्ध शेतकऱ्याने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केली.

शहाजानपूर लोणी येथील शेतकरी अभिमान साहेबराव मते (६०) यांच्याकडे खासगी सावकाराचे कर्ज होते. कर्जबाजारीपणामुळे निराश असलेल्या मते यांनी गुरुवारी पहाटे चारच्या दरम्यान जनावरांच्या गोठ्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरी घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे घडली. भीमराव गंगाधर चौधरी (६५) या शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजता घडली. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे.

लातुरात शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर- तालुक्यातील जेवळी येथील शेतकऱ्याने कर्ज व नापिकीच्या धास्तीने विष पिऊन आत्महत्या केली. माणिक धानोरकर (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या नावे शेती असून त्यांनी बँकेचे कर्ज काढले होते. गतवर्षी झालेली नापिकी व यावर्षीही पेरणी करूनही पावसाअभावी गेलेले पीक यामुळे ते निराश झाले होते.

वसमतमध्ये आत्महत्या
हिंगोली- वसमत तालुक्यातील पार्डी खु. येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. शंकर किसन नरवाडे (५०) असे शेतकऱ्याचे नाव अाहे.