आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोलीत तहसीलदारांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - पातोंडा येथील पैनगंगा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

हिंगोलीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर दुपारी 12.30 च्या सुमारास मंडळ अधिकारी वैजनाथ भालेराव, कोतवाल शंकर जाधव, कर्मचारी किशोर यादव यांच्यासह पातोंडा येथील अवैध वाळू उपसा करणार्‍यांविरुद्ध कारवाईसाठी गेले होते. त्यांनी नदीपात्रातील ट्रॅक्टर ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली.त्या वेळी दोन ट्रॅक्टरचालक तहसीलदार कडवकर यांच्या दिशेने ट्रॅक्टर घेऊन आले. कडवकर बाजूला झाले. त्यानंतरही आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी व इतर कर्मचार्‍यांनी कसाबसा जीव वाचवला. दरम्यान, एक ट्रॅक्टर पुसदच्या दिशेने पसार झाला, तर हिंगोलीच्या दिशेने पळून जाणार्‍या एमएच 38- व्ही 1728 आणि एमएच 38- बी- 3764 या दोन ट्रॅक्टर्सचा पाठलाग करून त्यांना पेडगाव वाडी येथे पकडण्यात आले. या ट्रॅक्टरचा मालक राजू विलास नागरे (रा. हिंगोली) याला ताब्यात घेऊन बासंबा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.