आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जालन्यात बेशिस्त वाहनधारकांना पिटाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- रिक्षा आणि फेरीवाले यांच्या बेशिस्तीमुळे जालना शहरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. वारंवार सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखेर गुरुवारी पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह फौजफाट्यासह बाहेर पडल्या. पथकाने दोन तासांच्या धडक मोहिमेत बेशिस्त वाहनचालक, फेरीवाल्यांना चोपून काढले.

वाहतूक पोलिसांची कानउघाडणी, कारवाईचे फर्मान : दुपारी 12.30 वाजता मामा चौकात एसपी सिंह यांनी सरप्राईज भेट दिली. फळविके्रते, कापड विक्रेत्यांच्या हातगाड्या, दुचाकी, रिक्षा, दुकानासमोर ठेवलेले साहित्य दिसून आले. याबाबत संबंधित वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना बोलावून चांगलीच कानउघाडणी केली.

धडक मोहिमेमुळे उडाली धांदल
अचानक सुरू झालेल्या या ऑपरेशनमुळे सर्वांचीच धांदल उडाली. बेशिस्त वाहनचालक सैरावैरा पळत सुटले. या वेळी सोबत आणलेल्या विशेष पथकाला सिंह यांनी कडक शब्दांत सूचना केल्या. या कारवाईची दिवसभर चर्चा होती.

कोल्हापुरातील कारवाईची आठवण
ज्योतीप्रिया सिंह फेब्रुवारीत जालन्यात पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. यापूर्वी त्या कोल्हापूर येथे अपर पोलिस अधीक्षक होत्या. त्यांनी टवाळखोरांविरोधात रस्त्यावर उतरून धडक मोहीम राबवली होती. गुरुवारच्या जालन्यातील कारवाईने कोल्हापूरच्या कारवाईची आठवण झाली.

या ठिकाणी केली कारवाई
नूतन वसाहत, मस्तगड, मुथा बिल्डिंग, मामा चौक, सिंधी बाजार, खवा मार्केट, टांगा स्टँड, बडी सडक, शिवाजी पुतळा चौक, कादराबाद, सराफा, बसस्थानक, औरंगाबाद चौफुली, मोतीबाग.

3 लाखांच्या शहरात अवघे 18-20 कर्मचारी
वाहतूक नियंत्रणासाठी 35 पोलिस अधिकारी-कर्मचारी आहेत. यापैकी फक्त 18-20 कर्मचारी प्रत्यक्षात ड्यूटीवर असतात. सध्या पोलिस भरती मैदानावर 6, उजळणी कोर्ससाठी 2, साप्ताहिक सुटी-7, अर्जित 3 तर दोघे किरकोळ रजेवर आहेत. कार्यालयात 2 कर्मचारी आहेत.

पाहा फोटोज्