आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये स्वाइन फ्लूचा रुग्ण; तीन संशयितांवर उपचार सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्हा रुग्णालयात दाखल तरुणाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. आणखी तीन संशयित रुग्ण दाखल झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. वडवणी तालुक्याच्या देवडी येथील नितीन बबन लोंढे (१९) यास सर्दी, ताप व खोकला येत असल्याने ५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले होते. शुक्रवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. याशिवाय तुकाराम दगडू वाकुटे (५५, शहाजानपूर, ता. बीड), दादा राजेंद्र हाल्लर (१९, नांदूर हवेली), नारायण हरिभाऊ तपासे (६८, कबाडगल्ली, बीड) हे संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल असून दरम्यान, जिल्हा रुग्णालयात आयसोलेटेड वॉर्ड तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या वाॅर्ड क्रमांक ६ च्या बाजूला असलेल्या कक्षांमध्ये या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. स्वाइनबाधित नितीन लोंढे हा काही दिवसांपूर्वी पुणे येथे गेला होता. तेथून परतल्यानंतर तो आजारी पडला होता. पाच महिन्यांपूर्वीही पुण्याहूनच हे लोण आले होते.